धक्कादायक! ‘सुशांतसिंह राजपूतचा गळा दाबून खून?’; सुशांतचे चाहते संतापले

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक नवीन खुलासे होत आहेत. बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांवर सुशांतच्या खुनाचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, आता सुशांतचा रुग्णवाहिकेत गळा दाबून खून केल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांकडून केला जात आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता. विशाल बंदगर ही रुग्णवाहिका चालवत होते. रुग्णवाहिकेमध्येच सुशांतचा गळा दाबून खून केल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांकडून केला जात आहेत. रुग्णवाहिका चालक विशाल बंदगरला याप्रकरणी चाहत्यांचे धमकीचे फोन येत आहेत.

बंदगर यांच्या मुंबई शहरामध्ये चार रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी काम करतात. रुग्णवाहिकेंवरील नंबरवर देशाच्या विविध भागातून फोन करून सुशांतचे चाहते विशालला अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. त्याचप्रमाणे त्याला धमकी देत शिविगाळ करत आहेत. सुशांतच्या चाहत्यांच्या त्रासाला कंटाळून विशाल यांनी अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

सुशांतला रुग्णवाहिकेतून घेऊन गेलो, त्यादिवसापासून चाहत्यांचे फोन येत असल्याचं विशालचं म्हणणं आहे. त्याबरोबरच, सुशांत जिवंत होता त्याला रुग्णवाहिकेत तुम्ही गळा दाबून मारलं याची शिक्षा तुम्हाला मिळेल, असंही सुशांतचे चाहते विशालला म्हणत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हजारोंचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे सावट

‘मी आजही संयम ठेवलेला आहे’, संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट

पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’; गिरीश महाजनांचा मुख्यमंत्र्यांना टोला