‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा

मुंबई | बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी शुभारंभ केला आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी सहा विकेट राखून सहज पराभूत (KKR vs CSK) केलं.

एमएस धोनीने (MS dhoni) या सामन्यात चमकदार खेळ दाखवला. आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचं त्याने दाखवून दिलं. धोनीने टीकाकारांना आपल्या फलंदाजीने उत्तर दिलं. पण त्याचा उपयोग झाला नाही.

कोलकाताच्या फलंदाजांनी 132 धावांचे लक्ष्य 18.3 षटकात आरामात पार केलं. केकेआरकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 44 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शेल्डन जॅक्सनच्या जोडीने केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

चेन्नई आजच्या सामन्यात आपल्या तीन प्रमुख खेळाडू शिवाय उतरला होता. या तिघांची उणीव चेन्नईला जाणवली. दीपक चाहर, मोइन अली आणि ड्वेन प्रिटोरियस हे तीन खेळाडू आजच्या सामन्यात नव्हते.

विजयानंतर श्रेयस अय्यरने मोठा खुलासा केला आहे. चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान, शेवटच्या षटकांमध्ये दव पडल्यामुळे गोलंदाजांना अडचणी येत होत्या आणि महेंद्रसिंग धोनी क्रिझवर उपस्थित असल्यामुळे थोडा ताण होता, असं श्रेयस म्हणाले.

सुरुवातीपासून संघ व्यवस्थापन, फ्रँचायझी खूप उत्सुक आहेत. आम्हाला ही लय यापुढेही कायम ठेवायची आहे, असंही श्रेयसने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं” 

यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; आयकर विभागाला सापडलेल्या डायरीने खळबळ 

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला मोठा झटका; न्यायालयानं सुनावली ‘इतक्या’ वर्षाची शिक्षा

“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांना सांगणार आहे” 

“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात”