मुंबई | गेल्या अनेक वर्षापासून टीव्हीवर झळकलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) अडचणीत सापडली आहे. एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. त्यावेळी बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत (Controversial statement by actress Shweta Tiwari) वादग्रस्त वक्तव्य केलं.
फॅशन जगताशी संबंधित असलेल्या या वेबसीरिज बाबत सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात तिने सहभाग घेतला होता. एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं ‘मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है’ हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
या चर्चा सत्रात तिने केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. भोपाळ आणि अनेक नेटकऱ्यांनी श्वेता तिवारीवर कडाडून टीका केली आहे.
अशातच भोपाळच्या श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारी विरुद्ध IPC कलम 295 (A) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ब्रा आणि भगवान यांचा संदर्भ जोडून श्वेताने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. श्वेता तिवारीच्या ‘शो स्टॉपर – मीट द ब्रा फिटर’ या मालिकेच्या लॉन्च इव्हेंटचे होस्ट सलील आचार्य यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
क्लिपमध्ये काही गैरसंवाद आहे ज्यावर वाद होत आहे. हा प्रश्न मी स्वतः विचारला होता. माझ्या समोर सौरभ राज जैन बसले होते. मी त्याला थेट देवाकडून ब्रा फिटरची भूमिका केल्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर श्वेता तिवारीने उत्तर दिलं, अशं आचार्य म्हणाले.
होय, याच भगवानकडून आम्ही फिटिंग करून घेतो, असं श्वेता म्हणाली होती. तिच्या वाक्याचा गैरअर्थ काढण्यात आला. सौरभ राज यांनी आधी मायथोलाॅजिकल शो केलेत, असंही आचार्य यांनी सांगितलं आहे.
प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीजण त्याला गोष्टी फिरवत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर आता श्वेता तिवारी काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुरुषांच्या ‘या’ सवयीमुळे होतोय स्पर्मवर परिणाम, लगेचच सवय सोडून द्या
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
कडाक्याच्या थंडीमुळे उद्भवतात समस्या; अशी लक्षणं दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला
Omicron किती वेळ जिवंत राहू शकतो?, अभ्यासातून सर्वात मोठा खुलासा झाला
सचिन तेंडूलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आता उशीर झालाय पण, रोहित-राहुलची जोडी…”