“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

सातारा | भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udyan Raje Bhosale) आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांच्यातील वाद काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. दोघेही सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात.

दोघेही एकाच पक्षात असून देखील एकमेकांवर टीका करण्याचा कोणताही चान्स सोडत नाहीत. नगरपालिकेची निवडणूकीत याचा प्रत्यय आला होता. अशातच आता व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी देखील शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टिपण्णी केली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. आज व्हॅलेंटाईन डे असल्यानं उदयनराजेंना शुभेच्छा पाठवल्या का?, असा सवाल पत्रकारांनी विचारला होता.

त्यावर शिवेंद्रराजेंनी मिश्किल उत्तर दिलं. माझ्याकडे उदयनराजेंचा नंबर नाही, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. मला ते नेहमी त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

माझ्याकडं त्यांच्या ड्रायव्हरचा देखील नंबर सेव्ह नाही. त्यामुळे उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या नाहीत, असं ते म्हणाले आहेत.

शुभेच्छा द्यायच्याच झाल्या तर मला त्यांच्या ड्रायव्हरलाच I Love You चा मेसेज पाठवावा लागेल, असं देखील उदयनराजे म्हणाले आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”

शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जारी, वाचा काय आहेत निर्बंध

कुडाळमध्ये शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा, पोलीस घटनास्थळी दाखल