…म्हणून माधुरी आणि भारती चालू कार्यक्रमात ढसाढसा रडल्या, पाहा व्हिडीओ

मुंबई | अलिकडच्या काही वर्षांमध्ये रिऍलिटी शोजला दर्शक अधिक पसंती दर्शवू लागले आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर अनेक रिऍलिटी शोज प्रदर्शित होत असतात. यातील काही शोज हे दर्शकांची अधिक पसंती मिळवतात. दर्शकांच्या पसंतीस पुरेपूर उतरलेला एक शो म्हणजे ‘डान्स दिवाने’.

डान्स दिवाने हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होत असतो. या कार्यक्रमाचे सध्या तिसरे पर्व चालू आहे. या पर्वात अनेक तगडे डान्सर्स एकमेकांना काट्याची टक्कर देताना पाहायला मिळत आहेत. यामुळे हा शो सध्या खूप जास्त चर्चेत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित, कोरिओग्राफर तुषार कालिया आणि धर्मेश हे तिघेजण या शोमध्ये जज आहेत. तर कॉमेडीअन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष हे दोघेजन हा शो होस्ट करत आहेत. डान्स दिवानेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या थीम्सवर स्पर्धक डान्स करत असतात.

या आठवड्यात डान्स दिवानेमध्ये ‘लव्ह स्पेशल’ थीम ठेवण्यात आली आहे. या आठवड्यात शोमध्ये आपल्याला प्रेमाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत. या एपिसोडमधील एक डान्स उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणणारा ठरला आहे.

रुपेश सोनी आणि सद्दाम शेख या दोन स्पर्धकांनी या एपिसोडमध्ये लव्ह थीमवर एक डान्स सादर केला. यामध्ये एकाने भिकाऱ्याची तर एकाने कुत्र्याची भूमिका केली. डान्समध्ये भिकारी आणि कुत्र्याचे संबंध आणि दोघांचाही जगण्यासाठी चाललेला संघर्ष दाखवण्यात आला.

हा डान्स खूप भावूक करणारा ठरला. या दोघांचा डान्स पाहून माधुरी दीक्षित आणि तुषारसह भारतीला देखील अश्रू अनावर झाले. भर कार्यक्रमात हे सर्वजण रडताना दिसले. तसेच यावेळी स्पर्धकांसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.

दरम्यान, कलर्स वाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पर्धेतील या क्षणाची झलक दाखवण्यात आली आहे. हा संपूर्ण एपिसोड येत्या शनिवार रविवारी पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणं स्वरा भास्करला महागात पडलं, FIR दाखल?

कंडोममध्ये सोनं घालून महिलांनी अशा जागी लपवलं की पाहून मुंबई पोलीसही चक्रावले!

संतापलेल्या ऐश्वर्याने ‘या’ कारणाने अभिषेकला दोन रात्री ठेवलेलं रुमबाहेर

पाकने माधुरी दीक्षित यांना मागितल्यानंतर ‘शेरशाह’ बत्रांनी दिलेल्या उत्तराने शत्रू हादरले होते

नेहा कक्कर लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? व्हिडीओतून झालं अघड