“अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका

मुंबई | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच मुंबईमध्ये पार पडलं आहे. अनेक मुद्द्यांवरून या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली होती.

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, आरक्षणाचा प्रश्न, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या मुद्द्यांवरून वाद पहायला मिळाला होता. तर ठाकरे सरकारनं राज्य विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडल्यानं भाजपनं जोरदार टीका केली होती.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर या विधेयाकावरून जहरी टीका केली. या दरम्यान विधेयकावर चर्चा करत असताना मुनगंटीवार यांची जीभ घसरली आणि त्यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

सरकारनं विद्यापीठ सुधारणा कायद्यात सुधारणा करताना एलजीबीटीक्यू समुदायातील नागरिकांना विद्यापीठ बोर्डावर नियुक्तीची परवानगी देण्यात आली आहे. यावरून मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठात सदस्य म्हणून बसवणार का?, असा संतापजनक सवाल मुनगंटीवार यांनी सरकारला केला. यावरून सभागृहात तर गोंधळ झालाच सभागृहाच्या बाहेर सुद्धा मोठा गोंधळ झाला होता.

या विधेयकात बायसेक्शुअल आणि असेक्शुअल अशी व्याख्या करण्यात आली होती. यावरून मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं होतं. त्यानंतर मात्र मुनगंटीवार यांच्यावर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी टीका केली आहे.

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनम कपूरनं मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. येस वुई एक्झिस्ट इंडिया या पेजची पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामला अकाऊंटला स्टोरी ठेवत सोनमनं टीका केली आहे.

अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय अशा शब्दात कपूरनं मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. परिणामी सध्या सोनम कपूरच्या या टीकेची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर नेटीझन्सनं जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यानं अशाप्रकारचं वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर महाविकास आघाडीनं जोरदार टीका केली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्यावतीनं मुनगंटीवार यांना उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल

‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत

‘मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका’; संजय राऊतांचा राज्य सरकारला घरचा आहेरje