IPL Breaking! अहमदाबादच्या टीमला बीसीसीआयची मंजूरी, ‘या’ खेळाडूला मिळू शकतं कर्णधारपद

मुंबई | मागील काही दिवसांपासून आयपीएलमध्ये (IPL 2022) येणाऱ्या दोन नव्या संघामुळे वादाला तोंड फुटलं होतं. अशातच आता सर्व वादांमध्ये मोठी माहिती समोर आली आहे.

आयपीएल 2022 साठी नवीन दोन संघ सामिल झाल्यानं आता अधिक रोमांच पहायला मिळणार आहे. येत्या आयपीएलपासून लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ सामिल होणार आहेत.

अहमदाबाद संघ विकत घेणाऱ्या सीव्हीसी ग्रुपचे सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर बीसीसीआयने एक समिती स्थापन केली होती.

या समितीने आपला रिपोर्ट बीसीसीआयसमोर ठेवला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने अहमदाबाद संघाला मान्यता दिली आहे. बीसीसीआयने सोमवारी अहमदाबाद संघाला ‘लेटर ऑफ इंटेंट’ दिला आहे.

त्यानंतर आता मेगा लिलावाचा मार्गही मोकळा झाला आहे. दर तीन वर्षांनी बीसीसीआयकडून खेळाडूंचा लिलाव घेण्यात येतो. आता पुढील तीन वर्षांसाठी खेळाडूंचा लिलाव हा दोन दिवस पार पडणार आहे.

अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ नवीन असल्याने आता या संघाचा कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या तगड्या खेळाडूला कर्णधारपद मिळू शकतं.

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला अहमदाबादचं कर्णधारपद मिळू शकतं, अशी चर्चा सध्या क्रिडाविश्वात होताना दिसत आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरचं नाव देखील समोर येत आहे.

हार्दिक पांड्यावर सध्या अहमदाबाद संघाच्या व्यवस्थापकांचं लक्ष असल्याचं दिसतंय. त्यामुळे हार्दिक पांड्यावर या लिलावात मोठी बोली लागू शकते.

महत्वाच्या बातम्या –

कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”

 राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख