“लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

मुंबई | मागील काही दिवसांपासून बीसीसीआय (BCCI) आणि विराट कोहली (Virat kohli) यांच्यात वाद पेटल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर विराट कोहलीने एकामागून एक सर्व जबाबदाऱ्यातून हात झटकले.

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आता विराट कोहली पहिल्यांदाच या विषयावर उघडपणे भाष्य केलं आहे.

लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्ही काय विचार करता, तुम्ही ते साध्य करू शकलात की नाही हे तुम्ही पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे, असं मत विराट कोहलीने व्यक्त केलं पाहिजे.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघासाठी अधिक योगदान देऊ शकता, त्यामुळे त्याचा अभिमान बाळगा, असं स्पष्ट मत विराटने मांडलं आहे.

लीडर होण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही. जेव्हा एमएस धोनी संघात होता तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हता की तो लीडर नव्हता, असंही तो म्हणाला.

कर्णधारपद सोडल्यानंतरही तो असा होता ज्यांच्याकडून आम्हाला इनपुटची गरज होती. जिंकणं किंवा हरणं आपल्या हातात नसतं, असंही विराट म्हणाला आहे.

दररोज चांगलं करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देखील विराटने यावेळी दिला आहे. मी एम एस धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि त्याच्यासारखाच विचार केला, असंही विराट म्हणाला आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षापासून विराटने सेन्च्यूरी केली नाही. त्यामुळे आता आगामी वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत विराट पुन्हा आपला जलवा सादर करेल, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं

 अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…