सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘या’ कारणामुळे सोडणार टेनिसचं कोर्ट

नवी दिल्ली | भारतीय टेनिसमध्ये सानिया मिर्झाचं (Sania Mirza) नाव अग्रस्थानी आहे. अशातच मागील काही दिवसांपासून सानियाला फिटनेसच्या समस्या सतावत होत्या.

सानिया मिर्झाचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर आता 2022 हे तिचे शेवटचं वर्ष असल्याचं तिने जाहीर केलं आहे.

तिचे शरीर तिला थकवत असल्याचं सानियाने म्हटलं आहे. प्रत्येक दिवसासाठी ऊर्जा आणि प्रेरणा सारखी नसते, असंही सानिया म्हणाली.

आता मी खेळणार नाही. मला सावरायला खूप वेळ लागतोय अशी भावना तयार होत आहे, असंही ती म्हणाली आहे.

माझ्या लक्षात आलंय की माझा मुलगा फक्त 3 वर्षांचा आहे आणि मी त्याच्यासोबत इतका प्रवास करून त्याला धोक्यात आणत आहे आणि ही गोष्ट मला काळजी घ्यावी लागेल, असंही सानिया मिर्झा म्हणाली.

माझं वय वाढतंय त्यामुळे आता शरीर देखील थकत आहे. वारंवार गुडघ्याचा त्रास जाणवतोय, असंही सानिया मिर्झा म्हणाली आहे.

मार्च 2019 मध्ये एका मुलाच्या जन्मानंतर 35 वर्षीय सानियाने टेनिसमध्ये पुनरागमन केलं होतं. परंतु कोरोना महामारी तिच्या प्रगतीत अडथळा ठरली.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सानियाने तिची जोडीदार नादिया किचेनोकसह निवृत्तीची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अखेर डुग्गू सापडला! बेपत्ता स्वर्णव सापडल्यानं आई-वडिल भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला! 

रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता