‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी

मुंबई | आज आम्ही तुम्हाला रॅडिको खेतानच्या शेअर बद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना कित्येक पटींनी अधिकचा रिटर्न दिला आहे. गेल्या 18 वर्षांत, रॅडिको खेतानच्या शेअरची किंमत रु. 8.79 वरून रु. 1090 रु. पर्यंत वाढली आहे. या वाढीनंतर या शेअरमध्ये जवळपास 124 पटींनी वाढ झाली आहे.

रॅडिको खेतानचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 1022 रुपयांवरून 1090 रुपयांपर्यंत वाढले आहेत. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या सहा महिन्यांत 570 रुपयांवरुन ₹1090 पर्यंत वाढला आहे, या कालावधीत Radico Khaitan च्या शेअर्समध्ये जवळपास 90 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या एका वर्षात हा शेअर 462.70 रुपये प्रति शेअरवरून 1090 रुपये प्रति शेअर झाला आहे, ज्यामुळे त्याच्या यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांना सुमारे 135 टक्के परतावा मिळाला आहे.

गेल्या 18 वर्षांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 8.79 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 1090 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या भागधारकांना सुमारे 12,300 टक्के रिटर्न मिळाला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या 1 लाखांचे आज 1.06 लाख झाले असते.

तसेच जर गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी रॅडिको खेतानच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असतील, तर ते आज 1.90 लाखांवर पोहोचले असतील. जर गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्या एका लाखाचे आज 2.35 लाख झाले असते.

जर गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 18 वर्षांपूर्वी 8.79 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 1 लाख रुपये 1.24 कोटी रुपये झाले असते.

दरम्यान, मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. आज सेन्सेक्स 433 अंकांनी घसरून 59919 च्या पातळीवर तर निफ्टी 143 अंकांच्या घसरणीसह 17873 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 50 चे 42 समभाग घसरणीसह बंद झाले. आजच्या घसरणीत जागतिक घटकांचा प्रभाव दिसून आला.

आजच्या घसरणीत रियल्टी, पीएसयू बँक, फार्मा आणि ऑटो समभागांचा मोठा वाटा होता. सेन्सेक्समधील टॉप 30 समभागांमध्ये सहा समभाग वधारले आणि 24 समभाग घसरले.

टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स आणि टीसीएसचे समभाग आज वाढीसह बंद झाले, तर एसबीआय, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि सन फार्मा यांचे समभाग घसरले.

महत्त्वाच्या बातम्या-

 “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद

 “अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश