महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाची बोलणी पुढील आठवड्यापासून

मुंबई | आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी पुढील आठवड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बैठका सुरु होणार आहेत. 

पहिली बैठक येत्या मंगळवारी मुंबईत होणार आहे. या दोन पक्षातील जागावाटपाची बोलणी झाल्यानंतर इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. 

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचाही यामध्ये समावेश आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. 

काँग्रेसची बैठक एकूण चार तास पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली. 

बैठकीला काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोर जावं लागल्याने अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दोन आठवड्यापूर्वी तो स्विकारण्यात आला. 

IMPIMP