नवी दिल्ली | इंटरनेटचे जग विचित्र व्हिडिओंनी भरलेलं आहे. दररोज येथे मोठ्या संख्येने व्हिडिओ अपलोड केले जातात. तर नेटकरी देखील या व्हिडीओला पसंदी दर्शवतात.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे. व्हिडिओ व्हीलचेअरवर बसलेल्या एका दिव्यांग व्यक्तीशी संबंधित आहे, त्यात जे दिसत आहे ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.
व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे, जो रात्री त्याच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो.
असहाय्य अशा दिव्यांगांच्या मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नाही. अशा परिस्थितीत तो स्वतःहून गेट उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो.
मात्र आत जात असताना तो गेटच्या जवळ अडकतो आणि त्याची व्हिलचेअर त्याठिकाणी अडकते आणि तो दिव्यांग व्यक्ती उलटा होऊन डोक्याच्या दिशेने खाली पडतो.
खाली पडल्यावर अनाचक दिव्यांग व्यक्ती अचानक उभा राहतो आणि चालायला लागतो. दिव्यांग व्हीलचेअरवरून खाली पडून स्वतःहून उठल्यानं नेटकऱ्यांनी देखील तोंडात बोट घातली आहेत.
या व्हायरल व्हिडीओ वरून असं वाटतंय की, या व्यक्तीने मुद्दामून व्हिलचेअरचा वापर केला असावा किंवा फसवण्यासाठी हे कृत्य केलं असावं.
मात्र गेटच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमुळे कथित दिव्यांग व्यक्तीचं कांड उघडकीस आलं आहे. त्यामुळे नेटकरी देखील पोट धरून हसत आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ एका दिवसात सुमारे 10 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी त्याला लाइक देखील केलं आहे.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कोहलीने अहंकार सोडावा अन्…”, कपील देव यांचा कोहलीला सल्ला
“मला मानसिक त्रास दिला जातोय”; शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं पत्र व्हायरल
तालिबान्यांचा यु-टर्न! लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव