मुंबई | गुजरात राज्यातील जुनागड (Junagarh) येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या सिंह आणि सिंहीणीची जोडी मुंबई येथील बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) आणली जाणार आहे.
याच्या बदल्यात बोरीवली उद्यानातील वाघ आणि वाघीण जुनागढ येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
गुजरातचे वनराज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा (Jagdish Vishwakarma) व सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवारी 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येेथे या विषयावर चर्चा करण्यात आली.
सदर प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रधान वनरक्षक सुनील लिमये (Sunil Limaye) आणि जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार (Abhishek Kumar) यांच्यात देखील चर्चा झाली आहे.
या मुद्दयावर गुजरातचे वनमंत्री विश्वकर्मा आणि महाराष्ट्राचे वनमंत्री मुनगंटीवार यांच्यात देखील विस्तृत चर्चा करण्यात आली. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे”; भाजप नेत्याची मोठी टीका
रायगडावरील पिंडदानाचे हिंदुत्वादी संघटनाकडून समर्थन; म्हणाले, “संभाजी ब्रिग्रेडचा आरोप…”