शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटलेलं कसं काय चालतं?- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणाऱ्या पुस्तकामुळे निर्माण झालेला वाद थांबण्याची चिन्हं नसतानाच या वादात भर पडण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं काय चालतं?, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

जाणता राजा ही शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रासपणे वापरली जाते. ते तुम्हाला कसं चालतं. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं जात तेही तुम्हाला मान्य आहे, याची आठवण मुनगंटीवार यांनी विरोधकांना करुन दिली आहे.

शरद पवारांवर जाणता राजा म्हणून पुस्तक निघालं. त्यांच्या कार्यकाळत 35 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मग त्यांच्या पुस्तकाला जाणता राजा नाव का देण्यात आलं?, असा सवाल मुनंगटीवार यांनी केला आहे. राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

मुनगंटीवार यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर भूमिका मांडली आहे. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कोणीशीही तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी देखील करु शकत नाहीत, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-