“महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार”

मुंबई | राज्यात विधानपरिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत असून आज मतदान पार पडलं. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीला रंगत आली आहे.

राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना महाविकास आघाडी व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजप आमदार राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना मदत करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या मुद्द्यावरून राजकारण रंगलं असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना अपक्ष आम्हाला सहकार्य करणार आहेत, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

आमदारांच्या नाराजीचा फायदा घेऊन आम्ही सत्ता स्थापन करणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले. या सरकारने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असा खोचक सल्ला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार असल्याचा मोठा दावा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात सध्या चुरसीची लढत पाहायला मिळत आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

’56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

“आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच”

“राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…”

अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप देणार नोकरी, ‘या’ नेत्याची मोठी घोषणा

‘त्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण