“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

मुंबई | राज्याच्या राजकारणात 2019 विधानसभा निवडणुकीपर्यंत आघाडी आणि युती असा राजकीय समीकरणांचा बोलबाला होता. परिणामी राज्यात सरळ दोन राजकीय गट पडले होते.

2019 विधानसभा निवडणुकीनंतर मात्र राज्याच्या राजकारणानं आपली कुस बदलली आहे. तब्बल 25 वर्ष राजकीय मैत्री जपत युती धर्म पाळणारे दोन पक्ष वेगळे झाले. परिणामी एका मोठ्या राजकीय संघर्षाला तेव्हापासून सुरूवात झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धाडसी आणि महत्त्वाच्या राजकीय निर्णयानं भाजप राज्याच्या सत्तेपासून लांब झाली. परिणामी राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार वाद पेटला आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेकडे सत्तेत मुख्यमंत्रिपद आहे. शिवसेना सत्तेच्या केंद्रस्थानी असली तरी शिवसेनेवर अनेकदा टीकेचा भडिमार झाला आहे.

भाजपकडून शिवसेनेला हिंदूत्ववाद, मराठीवाद, स्वाभिमान, बाळासाहेब ठाकरे, हिंदूह्रदयसम्राट या मुद्द्यांवरून घेरण्यात येतं. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेख करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी आमची युती होती, सोनिया गांधी यांना समर्पित शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं काॅंग्रेस आघाडीसोबत सत्तेत जाण्याचा पर्याय स्विकारल्यानं अशी टीका शिवसेनेला वारंवार ऐकवी लागत आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानं राज्यातील वातावरण आधीच तापलेलं आहे. अशात आता मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानं वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं

 अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…”