अहमदनगर | पारनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे तिकीट 1 आणि इच्छुक उमेदवार अनेक अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. त्यातच अहमदनगर जि.प. माजी उपाध्यक्ष आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे सुजीत झावरे यांनी निष्ठावंतांना डावललं तर वेगळा विचार करु, असा इशारा दिला आहे.
दोन वर्षांपासून सुजीत झावरे आणि प्रशांत गायकवाड विधानसभेची जोरदार तयारी करत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी आपल्या मनगटावरचं शिवबंधन तोडून हातावर घड्याळ बांधणाऱ्या निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. लंकेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने झावरेंच्या उमेदवारीसंदर्भातल्या अडचणी वाढल्या आहेत. किंबहूना त्यांची उमेदवारी धोक्यात आहे, असं मानलं जातंय.
पक्षवाढीसाठी ज्यांनी रात्रीचा दिवस एक केलाय. पक्षवाढ व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून कष्ट केलेत त्यांना बाजूला सारून जर पक्ष दुसऱ्या कुणाला उमेदवारी देत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असं झावरे म्हणाले आहेत.
पक्षवाढीसाठी बाहेरच्यांना संधी द्यावी याबाबत कुठलंच दुमत नाही. पण पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी पक्षाने घ्यावी, असं ते म्हणाले.
दरम्यान, पारनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी निलेश लंकेंचा विचार करते की झावरे दुसरा विचार करणार? हे पाहणे महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-साताऱ्यातून ‘हा’ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवेल; अजित पवारांनी जाहीर केलं नाव
-शरद पवार माझ्या ह्रदयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल- सचिन अहिर
-मी काटे मोडत नाही तर, फक्त घड्याळाला चावी देतो- उद्धव ठाकरे
-सचिन अहिरांनी ‘राम राम’ करताच राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड!
-शिवसेनेने पडणारा नेता नेला- नवाब मलिक