Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?

मुंबई | काही दिवसांपासून मुस्लीम समाजातील महिलांना सोशल मीडियावर टार्गेट केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बुल्ली बाई आणि सुल्ली डील या अॅपद्वारे हे लज्जास्पद काम केलं जात होतं.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर अधिक माहिती दिली आणि कारवाईची मागणी देखील केली आहे.

सुल्ली डील नावाच्या अॅपवरून मुस्लीम महिलांचे फोटो आणि फाईल्स, त्याचबरोबर त्यांची किंमत लिहून फाईल्स पब्लिश केली जात होती. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

सुल्ली डील अॅपवर ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या महिलांना टार्गेट केलं जात होतं. त्या महिलांवर घाणेरड्या कमेंट्स केल्या जातात. तिथं त्यांची बोली देखील ठरवली जात आहे.

समाजामध्ये तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवण्याचं काम केलं जात आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राजकीय हेतू देखील साध्य केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोफत आणि अनियंत्रित असलेल्या गिटहब या प्लॅटफॉर्मवरून ही माहिती प्रसारित केली जात होती. त्यामुळे आता गिटहबवर देखी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

समाज माध्यमांवर ही माहिती प्रसारित केली जात असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सायबर विभागाने यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अशा प्रकराचे पोर्टल केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे समर्थक चालवतात. त्यांनी ट्रोल आर्मी निर्माण केली आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे ते गृहमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये

‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला

नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला