नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यांनी पक्षप्रवेशासंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधला असल्याच्या बातम्या होत्या. मात्र तटकरेंनी या वृत्तावर संताप व्यक्त केलाय तसेच त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. मी पवार साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे. कोणी कुठेही जाऊ द्या… सुनिल तटकरे कुठेही जाणार नाही, असं ते म्हणाले.
मी सध्या दिल्लीत आहे. मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने पवार साहेबांसोबत आहे. अफवा पसरवणाऱ्या बिकाऊ पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
काल आम्ही पवार साहेबांसोबत मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलो होतो. काल अख्या दिवसभरात एमआयडीसी सीईओ, प्रधान सचिव यांच्यासोबत बैठका झाल्या. परवा मी दिवसभर श्रीवर्धनमध्ये होतो. त्यामुळे या अफवा आता थांबवणं गरजेचं आहे. मी मजबुतीने, विचाराने आणि सिद्धांताने पवारसाहेबांसोबत राष्ट्रवादीत आहे, असं तटकरे म्हणाले.
एखाद्याचं चारित्र्य हनन किती विकृत पद्धतीने होऊ शकतं, त्याचा हा नमुना म्हणजे माझी खोटी बातमी पसरवणं आहे, अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला.
राजकीय पक्षांमार्फत पत्रकारांना हाताशी घेऊन बिकाऊ पद्धतीने कोणी बातम्या पसरवत असेल तर त्यासारखं राजकीय दुर्दैव नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मी कधी, कुठे आणि केव्हा उद्धव ठाकरेंशी चर्चा केली हे दाखवावं, असं आव्हानही तटरेंनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल- प्रियांका मैदानात!
-वाढदिवशीच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप करणार???
-असा असेल उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!
-राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले; म्हणतात…
-…म्हणून आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणतात- धनंजय मुंडे