पुणे | पुण्यातील यु ब्रॉडबॅन्डचे इंटरनेट वापरणारे ग्राहक सध्या थर्ड क्लास सेवेमुळे त्रस्त आहेत. पुणे शहरातील ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून यु ब्रॉडबॅन्डच्या खराब सेवेमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे शहरात यु ब्रॉडबॅन्ड ही कंपनी वायफाय इंटरनेट सेवा पुरवते. परंतू यु ब्रॉड बॅडच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या खराब सेवेमुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंबंधी तक्रार केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला समस्या सोडवण्यासाठी पाठवले जात नाही. तसेच ग्राहकांना फक्त आश्वासने दिले जातात परंतू ती पाळली जात नाहीत.
यु ब्रॉडबॅन्डची सेवा ही गेल्या ४ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प आहे. विशेषकरून ऑनलाईन कामे करणाऱ्या ग्राहकांना याचा विशेष फटका बसला आहे.
यु ब्रॉड बॅडची सेवा यापूर्वीही काही खास नव्हती. वारंवार इंटरनेट स्पीड कमी असायचे. परंतू वारंवार तक्रार करूनही अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.
दरम्यान, यु ब्रॉडबॅन्डच्या या खराब सेवेमुळे ग्राहक आता पर्यायी सेवांच्या शोधात असलेले पाहायला मिळत आहे. यात जिओ ही कंपनी आघाडीवर असलेली दिसत आहे. कारण जिओने ‘जिओ गिगा फायबर ही सेवा आणली आहे. त्यामुळे यु ब्रॉडबॅन्ड ही सेवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर खासदार सुनिल तटकरे संतापले; म्हणतात…
-पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल- प्रियांका मैदानात!
-वाढदिवशीच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप करणार???