लाज वाटत नाही का? उर्फी जावेदची साडी पाहून नेटकरी संतापले, पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘बिग बॉस ओटीटी’मुळे चर्चेच आलेली अभिनेत्री उर्फी जावेद सध्या सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. अभिनयापेक्षा आपल्या अनोख्या ड्रेसिंगसेन्समुळे उर्फी प्रसिद्ध आहे.

उर्फीच्या हटके ड्रेसिंगसेन्समुळं तिला अनेकदा ट्रोल्सचा सामना देखील करावा लागतो. नुकतंच साडी घालून ईद सेलिब्रेशनला गेलेली उर्फी तिच्या कपड्यांमुळे आणखी एकदा ट्रोल झाली आहे.

आपल्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटसाठी उर्फीने ईद सेलिब्रेशनवेळी एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. मात्र, यावेळी परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीमुळे उर्फीला ट्रोल्सचा सामना करावा लागला आहे.

पिवळ्या साडीसोबत उर्फीने हलक्या निळ्या रंगाचे कानातले परिधान केले असून त्याच रंगाचा एक क्विवेज रिव्हिलींग ब्लाऊस देखील घातला आहे. ईदच्या दिवशी रिव्हिलींग कपडे घातल्याने उर्फी ट्रोल होत आहे.

किमान ईदच्या दिवशी तरी आपली संस्कृती लक्षात ठेवायची होती. असे कपडे घालताना लाज वाटत नाही का, अशा कंमेट्स उर्फीच्या या लूकवर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना मला या ट्रोल्सचा फरक पडत नसल्याचं उर्फी म्हणाली होती. तर मी कोणाला दाखवायला म्हणून नाही पण मला आवडात तसे कपडे घालते, असं स्पष्टीकरण देखील उर्फीनं दिलं होतं.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्त्वाच्या बातम्या-

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाचा देशमुखांना आणखी एक दणका

‘आपल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र

आबाबा! रणवीर-दीपिकाने खरेदी केलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

काळजी घ्या! मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

‘नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा…’, शरद पवारांचा खुलासा