…त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ट्विट डिलीट करावं लागलं

मुंबई | आज 17 सप्टेंबर. हा दिवस महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महत्वाचा आहे. आजच्या दिवशीच 1948 साली हैद्राबाद संस्थान (Hyderabad State) भारतात विलीन करण्यात आले.

हैद्राबात संस्थानचे नवाब मीर उस्मान अली (Nawab Mir Osman Ali) यांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय युद्धांअंती घेतला. त्यामुळे महाराष्ट्राला देखील त्याचा अविभाज्य असा मराठी भाषिक प्रांत मराठवाडा मिळाला.

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) आहे, तर देशासाठी आजचा दिवस हैद्राबाद मुक्ती दिन आहे. त्यामुळे देशात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबादला विजयस्तंभाजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकाळी सात वाजता ध्वजारोहण केले आणि ते एका विशेष कार्यक्रमासाठी हैद्राबादला रवाना झाले. त्यानंतर शिवसेनेने सकाळी नऊ वाजता दुसऱ्यांदा ध्वजारोहण केले.

आज प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची देखील जयंती आहे. त्याचबरोबर आज अनागारिक धम्मपाल (Anagarik Dhammapal), पेरियार रामस्वामी (Periyar Ramaswami) आणि कॉम्रेड शरद पाटील (Comrade Sharad Patil) यांची देखील जयंती आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक शुभेच्छा संदेश पाठविला होता.

त्यात त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख के. सी. ठाकरे (केशव सीताराम ठाकरे) असा केला होता. त्यामुळे त्यांच्या या संदेशावर अनेक तर्क वितर्क झाले आणि प्रतिक्रिया उमटू लागल्या.

त्यामुळे त्यांनी ते ट्विट डिलीट केले आणि सुधारणा करुन प्रबोधनकार ठाकरे असे केले. त्यांनी सुधारीत ट्विट टाकल्यामुळे हा वाद आता शांत झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद; दोनदा झाले ध्वजारोहण

‘मनसे या दोघांचा बंदोबस्त लवकर करेलच’; राज ठाकरेंचं पत्र चर्चेत

‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; अटक होण्याची शक्यता

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, दिल्लीच्या पातशहांच्या…

लहानग्यांसाठी खूशखबर; पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी गृहपाठ होणार बंद!