खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

नवी दिल्ली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा भारतातील 14 राज्यात शिरकाव झाल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात एकापाठोपाठ एक अनेक खासदार व मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काळजी करण्याचं कसलंही कारण नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन सुप्रिया सुळेंकडून करण्यात आलं आहे. त्यासोबतच सुप्रिया सुळेंनी सर्वांना काळजी घेण्याची विनंती देखील केली आहे.

दरम्यान,राज्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याने धाकधूक वाढली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. विधानसभेतील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनादेखील कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. वर्षा गायकवाड सध्या विलगीकरणात असून त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव बघता केंद्रासह सर्वच राज्य देखील सतर्क झाले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लादायला सुरूवात केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा

“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”

“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”