एमपीएससी परिक्षेबाबत सुप्रिया सुळेंची ‘ही’ मागणी; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

मुंबई | वयाची मुदत संपणाऱ्या उमेदवारांना पुढील वर्षी एमपीएससीच्या परीक्षांना बसू देण्यात यावं. अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कोरोनाचा फटका वयाची मुदत संपणाऱ्या उमेदवारांना बसता कामा नये, असं मत त्यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय, “कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत यावर्षी सरकारी नोकरभरती होणार नाही अशी स्थिती आहे. याचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्या व यावर्षी वयाची मुदत संपणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे. यामुळे अनेक पात्र व लायक उमेदवार शासनाच्या सेवेत येऊ शकणार नाहीत.  शिवाय त्यांचे श्रम वाया जातील.”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे हे अभूतपूर्व संकट लक्षात घेता या उमेदवारांना वयाची मर्यादा वाढवून एमपीएससी च्या पुढील परिक्षांसाठी बसून देण्यात यावं. याबाबत सरकारनं सकारात्मक विचार करावा.” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, एमपीएससीच्या सर्वच परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यातील कोरोनाचं संक्रमण वाढतच राहिल्यास परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षेसाठी वयाची शेवटची मुदत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळं भितीचं वातावरण पसरल्याचं पहायला मिळतंय.

 

-काय रे अक्षय, गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?, आव्हाडांचा चिमटा

-“बुटक्याने उंटाचा कधीच मुका घेऊ नये; नाहीतर दात पडतात”