Mr. IPL इस बॅक! ‘या’ नव्या इनिंगसह आयपीएलमध्ये रैनाची दमदार एन्ट्री

नवी दिल्ली | बहूप्रतिक्षित आयपीएल 2022 सुरू होण्यासाठी आता अवघ्या 10 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. बीसीसीआयकडून आयपीएल आयोजनाची तयारी करण्यात येत आहे.

सर्व दहा संघांतील खेळाडू आपापल्या कॅम्पमध्ये दाखल होत आहेत. परिणामी विविध चर्चा रंगत असल्याचं सध्या पहायला मिळत आहे. अशातच क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आपल्या आप्रतिम खेळाच्या जोरावर भारतीय संघाला एकहाती सामने जिंकून देणारा धाकड अष्टपैलू खेळाडू Mr. IPL म्हणजेच सुरेश रैना आयपीएलमध्ये परत येत आहे. मात्र भूमिका वेगळी असणार आहे.

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासमवेत रैना आपल्या आयुष्याच्या नवीन इंनिगला सुरूवात करणार आहे. परिणामी रैनाचे चाहते खुश आहेत. रैना आयपीएलमध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या मेगालिलावात रैनाला कोणत्याच संघानं खरेदी केलं नव्हतं. रैना हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे.

सुरेश रैना मिस्टर आयपीएल या टोपणनावानं क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. एकहाती कामगिरीच्या आधारावर रैनानं चैन्नईला अनेकदा सामने जिंकून दिले आहेत.

रैनान आयपीएलमध्ये 205 मॅचमध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकाच्या जोरावर 5528 धावा केल्या. धावांची टांकसाळ उघडणारा हा खेळाडू आता शब्दांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

दरम्यान, चैन्नई संघाकडून खरेदी करण्यात आलं नसलं तरी तो समालोचन करत असताना चैन्नईच्या प्रेक्षकांना दिलासा मिळणार आहे. सर्वजण रैनाच्या या नव्या इनिंगची वाट पाहात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 चीनमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार अॅक्शन मोडवर

 Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये केमिकल वाॅर होणार???, जगाचं टेन्शन वाढलं

“CD होती पण वेळ नव्हती, आता CD बाहेर काढणार”; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार

 Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा

Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज