“तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय”

मुंबई | एकीकडे देशात कोरोनाचं संकट थैमान घालत आहे तर दुसरीकडे चांगलीच राजकीय नाट्य रंगलेली पहायला मिळत आहेत. नुकतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुक आणि व्हाॅट्सअपवर भाजपचं नियंत्रण आहे, अशी टीका केली होती. राहुल गांधीनंतर आता शिवसेनेनं देखील याच मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग व्यवसायातील किमान नीतीनियम तुम्हाला पाळावेच लागतील. धंदा कमी होईलं म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुक सारख्या माध्यमांचा वापर सुरु असेल तर त्याकडे कानाडोळा करता येणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून फेसबुकवर टीका करण्यात आली आहे.

फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद प्रतिवाद व्हायला हरकत नाही. पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधरी आहे म्हणून फेसबुक सारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही, असंही सामनातून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर बदनामी करणं हा एक पगारी व्यवसाय झाला आहे. कालपर्यंत मनमोहन सिंग यांना दुषणे देणारे आज त्याच माध्यमांचा वापर करून पंतप्रधान मोदी किंवा फडणविसांची खिल्ली उडवतात तेव्हा वाईट वाटतं, अशी टिकाही सामनामधून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…