Top news मनोरंजन

सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृ.त्यू प्रकरणात ड्र.ग्जसंबंधी अनेक कलाकारांची नाव समोर आली आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रध्दा कपूर यांची नावं समोर आली आहेत.

आता या सर्वांच्या नावाबरोबरच अजून एका नावाची चर्चा होत आहे. ते नाव म्हणजे रिया चक्रवर्तीची मैत्रीण सिमोन खंबाटा… रिया चक्रवर्तीच्या व्हाट्स अ‌ॅप चॅटमधून सिमोन खंबाटा हिचे नाव समोर आले आहे.

सिमोन खंबाटा ही एक फॅशन ब्लॉगर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. तिचं एक युट्यूब चॅनेल आहे, त्याचे नाव Mama Say’s असं आहे. सिमोन खंबाटाचा जन्म दुबईमध्ये झाला असून तिचा सांभाळही तिथेच झाला आहे.

सिमोनचं करण पंथाके याच्यासोबत प्रेम होतं, त्यानंतर तिनं त्याच्यासोबत लग्न केलं. त्यांना सेरेना नावाची मुलगी आणि जेफर नावाचा मुलगा झाला. जेव्हापासून सिमोनचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून तिने तिचे इन्स्टाग्राम खाते खाजगी केले आहे.

सिमोनच्या यु ट्यूब चॅनेलवर ती आपल्या मुलांसोबत दिसत असे. यातून ती आई होण्यासाठी सल्ला देत असे तसेच मुलांना कसे सांभाळायचे, त्यांचे आरोग्य, राहणीमान आणि आहार अशा गोष्टींबद्दल माहिती देत असे.

सिमोन आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हे चांगले मित्र आहे. १५/२० ही सुशांत सिंह राजपूतची के.स आणि ड्र.ग्जच्या संबंधात दीपिका पदुकोण, सिमोन खंबाटा आणि रकुल प्रीत सिंह यांची चौ.कशी करणार आहे.

या सर्वांचे नाव जया शहा यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जया यांनी दीपिकाची मॅनेजर करिष्मा हिचेही नाव सांगितले आहे. एन.सी.बीने सिमोनला स.मन्स पाठवण्याची तयारी केली आहे.

त्याचबरोबर १६/२० के.समध्ये श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची नावे आहे. त्यातच धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता आणि दिग्दर्शक क्षितिज प्रसाद यांनाही एन.सी.बीने स.मन्स पाठवली आहे. शुक्रवारी क्षितिज सकाळी ११ वाजता एन.सी.बीच्या चौ.कशीसाठी येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल!

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घडला असा प्रकार; साऱ्या पुण्यात उडाली खळबळ

आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीनं आणली ही जबरदस्त ऑफर

सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं असं काही; आजारी चाहत्याला बसला सुखद धक्का!

सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; आता रियाच्या वकिलांनी केला ‘हा’ नवा दावा