मुंबई | गेल्या दोन वर्षापासून देशातील आणि बिहारचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) नावाभोवती फिरत आहे. सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर कडाडून टीका केली आहे.
राज्यातील एका मंत्र्यांना व्हॉट्सअॅपवर धमकी येते. राजपूत नावाच्या व्यक्तीला अटक होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्यानंतर या महाराष्ट्रात ही आत्महत्या नाही हत्या आहे, असं सांगण्यात आलं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
सुशांत सिंग राजपूतच्या आडून बऱ्याचशा मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सुशांत सिंग राजपूतच्या हत्येमागे अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर दडपण आणून गुन्हा दाखल करण्यात आला, असंही मलिक म्हणाले
आत्महत्या मुंबईत घडली बिहारमध्ये तक्रार नोंद होते आणि तो तपास बिहारचे पोलीस मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना बीएमडब्लू आणि मर्सिडीज गाडीमध्ये फिरत होते. ती गाडी कोणाची होती?, असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.
ती गाडी भाजपच्या एका नेत्याची होती. त्याचे नाव आहे निलोपत उत्पल. त्या दिवसापासून आजपर्यंत सुशांत सिंह राजपूत ट्रेंड होत आहे. म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी महिन्याला 30 लाख रुपये पुरवण्याचं काम होतं, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
सुशांत सिंह राजपूतची केस रजिस्टर झाल्यानंतर कायद्याने मुंबईमध्ये ट्रान्सफर करणं बंधनकारक होतं. पण बिहार सरकारने निर्णय घेतला की हे प्रकरण सीबीआयला द्यायचे पण सीबीआयला केस दिल्यानंतर ही आत्महत्या की हत्या हे सिद्ध झालेले नाही, असंही मलिक म्हणाले आहेत.
ट्विटरच्या माध्यमातून मला धमक्या येत आहेत. मला बरेचशे पत्र आलेले आहेत मी गृहमंत्र्यांना पाठवले आहेत. कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनसारख्या संस्था आहेत, असं मलिक म्हणाले
दरम्यान, बऱ्याच मंत्र्यांना धमक्या येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून एसआयटी गठीत करावी, अशी मागणी देखील मलिक यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बहुप्रतिक्षित शक्ती कायदा बहुमताने मंजूर, विरोधकांकडूनही कायद्याचं स्वागत
संसद आहे की आखाडा?, खासदारांची संसदेत लाथा बुक्क्यांनी तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
“देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर मी तिकीट काढून देतो”
…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे
रणवीर सिंगने केलं कपिल देव यांना KISS?; सोशल मीडियावर ‘या’ फोटोची एकच चर्चा