राज्यात नाईट कर्फ्यू लागणार का?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

मुंबई | मागील काही महिन्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लावण्यात आली होती. अशातच आता ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.

देशात सध्या ओमिक्राॅन रूग्णसंख्येने 300 चा आकडा पार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाल्याचं दिसतंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलवली होती.

या उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना रूग्णसंख्येचा आणि राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी काही सुचना देखील दिल्या आहेत.

काही वेळापूर्वीच मध्य प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे आता सर्व इतर राज्य देखील रात्रीची संचारबंदी लागू करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाने याबद्दलची माहिती दिली आहे. या बैठकीत राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

आज विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचक वक्तव्य केलं होतं. केंद्र सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याच्या सुचना केल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. राज्यात आज आढळलेल्या 23 रुग्णांमध्ये पुण्यातील  रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात तब्बल 13 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“ती गाडी कोणाची होती?, त्या दिवसापासून सुशांत सिंह राजपूत…”, मलिकांचा सवाल

बहुप्रतिक्षित शक्ती कायदा बहुमताने मंजूर, विरोधकांकडूनही कायद्याचं स्वागत

संसद आहे की आखाडा?, खासदारांची संसदेत लाथा बुक्क्यांनी तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ

“देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर मी तिकीट काढून देतो”

…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे