‘मी आजही संयम ठेवलेला आहे’, संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येवरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षांनी सुशांतच्या आत्महत्येत हात असल्याचा आरोप केला. मात्र आदित्य ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंनी दिलेल्या स्पष्टीकरणावर सवाल केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत तो काही गुन्हा नाही. सुशांत सिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून भाजपने त्यांना निशाण्यावर धरलं आहे.

मी आजही संयम ठेवलेला आहे’, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा?, ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरं होईल, असं अतुल भातखळकर यांनी केला आहे.

दरम्यान, भातखळकर यांनी केलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट

पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’; गिरीश महाजनांचा मुख्यमंत्र्यांना टोला

…म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंंत्री उद्धव टाकरेंना केला फोन; म्हणाले…

भारतरत्न लतादीदींनी राम मंदिराचं श्रेय दिलं ‘या’ दोन महत्वाच्या नेत्यांना!