सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती रुग्णालयात

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडालं आहेत.

सुशांतचं पार्थिव असलेल्या कूपर रुग्णालयात मैत्रीण रिया चक्रवर्ती पोहोचली आहे. सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचलं आहे.

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती मागच्या दरवाजाने रुग्णालयात गेली. यावेळी रियाला दु:ख अनावर झाल्याचं पाहायला मिळालं

सुशांतचे वडील बिहारहून मुंबईत दाखल झाले असून, सुशांतच्या पार्थिवावर आज दुपारी चारच्या सुमारास विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-शाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचं निधन

-“माझ्या वडिलांची काळजी घ्या, मी लवकरच पाटण्याला येईन….”

-सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…

-हात जोडून सांगतो… द्वारकारनाथ संझगिरी यांची कोरोनाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी पोस्ट