T20 World cupचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने सामने

मुंबई | ऑस्ट्रेलियात होणाऱ्या यंदाच्या T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.

16 ऑक्टोबर पासून T20 विश्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी खेळला जाणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे भारत पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.

आयसीसीने शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी नवीन शेड्युलड जारी केलं. सुपर-12 राऊंडची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होईल. सुपर-12 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. आता 23 ऑक्टोबर रोजी या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी टीम इंडियाला असेल.

वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 45 सामने होणार असून 7 वेगवेगळ्या शहरांमधील मैदानावर सामने रंगणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी काळजी घेत हे सामने होणार आहेत. विश्वचषक सामन्यांसाठी तिकिटांची विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘…त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

  एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

  ‘या’ ठिकाणी शाळा बंदच राहणार, धडकी भरवणाऱ्या आकडेवारीनं चिंतेत भर

  गोडसेच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, म्हणाले “एक कलाकार म्हणून…”

“हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव ‘चंपा’ आणि माकडाच्या बाळाचं नाव ‘चिवा’ ठेवू”