‘…त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई | स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून चुकीच्या वर्तणुकीचे कारण देत अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. यानंतर किरण माने प्रकरणानं राज्यात चांगलीच खळबळ माजवली.

किरण माने प्रकरण पेटल्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीनं एक पत्रक जारी करत किरण मानेवर गंभीर आरोप केले. किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः मालिकेतील महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, असं स्टार प्रवाहनं म्हटलं.

किरण माने प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनीही उडी घेतलेली पहायला मिळते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने प्रकणावर प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही बाजू ऐकून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मालिकेतील अनेक सहकलाकारांनी किरण माने यांची बाजू घेत प्रोडक्शनच्या विरुद्ध आपली बाजू मांडली आहे. आपलं करिअर पणाला लावून या स्त्रिया बोलतात तेव्हा तुम्हीच ओळखा सत्य काय असू शकतं, असं आव्हाडांनी म्हटलं.

त्या सर्व स्त्री कलाकारांचा सत्कार केला पाहिजे. त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत. त्यांनी न घाबरता आपलं करिअर पणाला लावलं, असं होता कामा नये. त्यांनाही आज धमक्या येत आहेत, असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

एका स्त्रीने आरोप केला आणि बाकीच्या कलाकारांनी त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे कुठेही कसलाही रंग न लावता चॅनल, प्रोडक्शन हाऊस या सर्वांनी एकत्र बसावं आणि हा तिडा सोडवावा. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, असा सल्लाही आव्हाडांनी दिला.

किरण माने प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अचानकपणे काढून टाकल्यानंतर अभिनेते किरण माने चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

  ‘या’ ठिकाणी शाळा बंदच राहणार, धडकी भरवणाऱ्या आकडेवारीनं चिंतेत भर

  गोडसेच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, म्हणाले “एक कलाकार म्हणून…”

“हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव ‘चंपा’ आणि माकडाच्या बाळाचं नाव ‘चिवा’ ठेवू”

 प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतात, “दारू म्हणजे औषध, आयुर्वेदात…”