Teacher Bharti 2024 New Rules l शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एनसीटीईने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील शाळांमध्ये इयत्ता 9वी ते 12वीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना आता टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) द्यावी लागणार आहे. हे पुढील शैक्षणिक सत्र म्हणजेच 2024-25 पासून लागू होणार आहे. सध्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य होती. ही प्रणाली सध्या केंद्रीय स्तरावर लागू केली जाईल जी राज्ये देखील स्वीकारू शकणार आहेत.
Teacher Bharti 2024 New Rules l राष्ट्रीय परिषदेत केली घोषणा :
नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनने (एनसीटीई) टीईटी संदर्भात सोमवारी झालेल्या राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली आहे. एनसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश सिंह म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेने गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना हे समजेल.
एनसीटीईचे सचिव केसांग वाय शेर्पा यांनी दिली माहिती :
Teacher Bharti 2024 New Rules l यावेळी एनसीटीईचे सचिव केसांग वाय शेर्पा यांनी शाळांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पुढील शैक्षणिक सत्रापासून टीईटी आयोजित करण्याबाबत माहिती दिली आणि त्या दिशेने तयारी वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे.
तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली होती.
Teacher Bharti 2024 New Rules l तसेच यासंदर्भात CBSE चेअरपर्सन IAS निधी छिब्बर म्हणाल्या आहेत की, शिक्षकांची सक्षमता वर्गात एक प्रभावी वातावरण निर्माण करत असते. त्यामुळे शिक्षकाची योग्यता आणि कार्यक्षमता समजून घेण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET ) फारच महत्त्वाची भूमिका बजावत असते.
News Title : Teacher Bharti 2024 New Rules
महत्वाच्या बातम्या –
बापरे! या कंपनीच्या इलेक्ट्रिक कार 1.20 लाख रुपयांनी झाल्या स्वस्त
अभ्यास करायचा कंटाळा येतोय? तर या 3 टूल्सची मदत घेऊन अभ्यास करा; सहज पास व्हाल
सिद्धार्थने कियाराला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी काय गिफ्ट दिले? अभिनेत्रीने सांगितले…
पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बंद राहणार; जाणून घ्या वेळ पाहा आणि पर्यायी मार्ग
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता