OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत

मुंबई | मागील काही वर्षापासून भारतात OnePlus मोबाईलची क्रेझ वाढताना दिसत आहे. अनेक तरूणांना OnePlus ने वेड लावल्याचं दिसतंय. अशातच आता OnePlus ने आज मोठी घोषणा केली आहे.

OnePlus ने आज भारतात OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 ची घोषणा केली आहे. नवीन, अधिक शक्तिशाली प्रोसेसरमुळे OnePlus 9R मुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

कंपनीने OnePlus लाँच इव्हेंट विंटर एडिशनमध्ये OnePlus 9RT स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 इयरबड लॉन्च केले आहेत.

हा स्मार्टफोन त्याच्या मागील आवृत्तीच्या तुलनेत अनेक अपग्रेडसह येतो. OnePlus 9RT कंपनीने काही काळापूर्वी चीनमध्ये लॉन्च केला होता. आता तो भारतातही लाँच झाला आहे.

OnePlus 9RT मध्ये 6.62-इंच फुल-एचडी+ Samsung E4 AMOLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट के साथ उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 88 प्रोसेसरवर काम करणारा आहे.

OnePlus 9RT मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. व्हिडिओ प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे. त्यामुळे व्हिडीओ रेकाॅर्डिगसाठी फोन चांगला मानला जातोय.

OnePlus 9RT ची किंमत त्याच्या बेस व्हेरिएंटसाठी 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल मेमरी आहे.

OnePlus Buds Z2 TWS मध्ये हीच जुनी डिझाईन वापरण्यात आली आहे. यात 11mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.

OnePlus Buds Z2 ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स 4999 रुपयांना खरेदी करता येतील. त्यामुळे आता ग्राहकांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांचा रंगला सामना, व्हॉलिबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख