‘तीन महिने मी तिच्या मोबाईलला रिचार्ज करत होतो, पण तरी सोडून गेली’; तरूणाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सतत नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात. यातील काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून आपोआपच डोळ्यात पाणी येतं. तर काही व्हिडीओ खळखळून हसवणारे असतात. मात्र, सोशल मीडियावर अनेकांनी विनोदी आणि मजेशीर व्हिडिओच पाहायला आवडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एक प्रियकराने सांगितलेल्या आपल्या ब्रेकअपच्या स्टोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रियकराने सांगितलेली कथा ऐकून तुम्हाला त्याच्यासाठी वाईटही वाटेल आणि हसूही येईल.

याव्हिडीओ मध्ये एक तरुण आपल्या एक्स गर्लफ्रेंडबाबत सांगत आहे. आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलच्या भावना तो व्यक्त करत आहे. व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला आहे. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की हा प्रियकर आपली व्यथा एका रिपोर्टरला सांगत आहे. तो सांगतो की प्रेयसी त्याच्याकडे पैसे मागत होती.

याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि ती त्याला सोडून गेली. तीन महिन्यांपासून मी तिच्या मोबाईलला रिचार्ज करत होतो. मात्र तरीही ती मला सोडून गेली, असं त्यांनी म्हटलंय.

रिपोर्टर त्याला विचारतो की तुझी प्रेयसी तुला सोडून गेली याचं दुःख आहे का….यावर हा तरुण उत्तर देतो, की ती माझी प्रेयसी नव्हती, त्यापेक्षाही जास्त होती. माझं घर संपलं, मी बर्बाद झालो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

महत्त्वाच्या बातम्या-

लस न घेण्यासाठी रडून आकाश-पाताळ एक केलं, इंजेक्शन दिसताच महिला शेतात पळत सुटली, पाहा व्हिडीओ 

“सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है”  

राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब 

जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल