“देशाचं नेतृत्व बदलायला हवं, लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार”

नवी दिल्ली | देशात पाच राज्यातील विधानसभेचं वातावरण चांगलंच पेटलेलं आहे. पाचपैकी सत्ता असलेल्या चार राज्यांमध्ये भाजपला चांगलाच विरोधाचा सामना करावा लागत आहे. परिणामी निवडणूक रंजक ठरत आहे.

गोवा, उत्तराखंड, मणिपूर, उत्तर प्रदेश या चार राज्यात सध्या भाजप सत्ताधारी पक्ष आहे. परिणामी परत सत्ता मिळवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात भाजपला बंडखोरीचा फटका बसत आहे.

पाच राज्यातील विधानसभा निव़डणुकीनंतर विरोधी पक्षांची ताकत मोदी सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आता सर्व विरोधक करत आहेत. अशातच तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भारताचे संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. देशातील युवकांनी आपल्या क्रांतिकारी विचारांना पुढं नेत आपल्या हक्कांसाठी लढण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राव यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरदर्शी नेते नाहीत. त्यांच्या काळात देशाची अधोगती झाली आहे. भाजपला हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला पाहिजे, असं वक्तव्य राव यांनी केलं आहे. परिणामी ऐन निवडणुकीच्या काळात राजकारण पेटणार आहे.

महारष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आपण लवकरच मुंबईत जाणार असल्याचंही राव म्हणाले आहेत. परिणामी ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता राव हे देखील महाविकास आघाडीच्या पावलावर पावलं टाकणार अशी चर्चा रंगत आहे.

आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं. देशाला असमजूतदार पक्ष आणि नेत्यापासून मुक्त करायला हवं, असं राव यांनी म्हटल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. समाजात फुट पाडण्याचं आणि खोटा प्रसार-प्रचार करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. चंद्रशेखर राव यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर देखील टीका केली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर आता राव येणार असल्यानं मुंबई राजकीय बदलांच प्रमुख केंद्र होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”

अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…