फडणवीसांच्या आणखी एका महत्त्वकांक्षी योजनेला ठाकरे सरकारचा ब्रेक?; भाजपला धक्का

मुंबई |  मराठवाडा वॉटर ग्रीड ही तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वकांक्षी योजना होती. मात्र याच योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावण्याचे संकेत दिले आहेत.

मराठवाड्याला मुबलक पाणी मिळावं आणि मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी देवेंद्र फडणीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आखली होती. या योजनेचं काम एका खाजगी कंपनीला देण्यात आलं होतं. या योजनेसाठी फडणवीसांनी 10 हजार कोटीदेखील दिले होते.

मराठवाडा वॉटर ग्रीड या फडणवीसांच्या योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे ही योजना देखील ठाकरे सरकार बंद करणार का? असा प्रश्न सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. ही योजना जर ठाकरे सरकारने बंद केली तर भाजप मात्र सरकारला जोरदार विरोध करू शकतं.

दरम्यान, अजित पवार यांनी या योजनेच्या व्यावहारिकतेवरच प्रश्नचिन्ह शंका उपस्थित केलीये. त्यामुळे ठाकरे सरकार ही योजना बंद करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अर्थव्यवस्थेवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर सडकून टीका