Top news मनोरंजन

कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर अभिनेत्री झाली आनंदी, म्हणाली…..

Photo Credit - Rubina Dilaik / Instagram

मुंबई| देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

मनोरंजन जगातील अनेक कलाकारांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैकचे नावही आता या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे.

अभिनेत्री रुबिना दिलैकला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. रुबिनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

रुबीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी नेहमी सकारात्मकतेकडे पाहत असते. आता मी एक महिन्यानंतर प्लाझ्मा दान करण्यास सक्षम असेल. कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यामुळे घरात 17 दिवस क्वारंटाईन राहणार आहे. गेल्या पाच-सात दिवसात जो कोणी माझ्या संपर्कात आला त्याने त्याची कोरोना चाचणी करुन घ्यावी.’

रुबीना दिलैक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पहायला मिळते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांची संंपर्क साधत असते.

रुबिनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती’ या मालिकेमध्ये काम करत आहे. तसेच बिग बॉस नंतर ती आपल्या पहिल्या ‘मरजानियां’ या अल्बममध्ये झळकली होती. तसेच पारस छाब्रासोबत ‘गलत’ हा अल्बमही नुकताच रिलीज झाला आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

महत्वाच्या बातम्या –  

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘या’ अभिनेत्यांनं…

एक समोर, एक शेजारी मगरींनी आडवला महिलेचा रस्ता त्यानंतर जे…

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

चक्क लांडग्याने सिंहाची शेपटी खेचली अन्…, पाहा व्हिडीओ

IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

IMPIMP