रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असलेली रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तर काही व्हिडीओ पाहून त्यांनी केलेल्या कामगिरीची कौतुक करावं तितकं कमी असतं. आपण पाहतो जगात माणूसकी नावाची गोष्ट आजकाल संपत चालली आहे.

सर्वांकडे पैसा आल्यामुळे जोतो आप-आपल्या जगात वावरत असतो. कोणालाच कोणाची पर्वा नसते. परंतू सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माणूसकीचे एक जिवंत उदाहरण म्हणायला काहीचं हरकत नाहीय. जगात माणूसकीच सर्वांत श्रेष्ठ असल्याचं या व्हिडीओमधून आपल्या पाहायला मिळतं आहे.

अनेकवेळा आपण पाहतो की रुग्णवाहिका काही कारणास्तव वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहचली नसल्याने त्या रूग्णाला त्याचा जीव गमवावा लागतो.

व्हायरल व्हिडीओमध्ये लोक ट्राफिकमध्ये अडकेलेल्या रूग्णवाहिकेला रस्ता करून देत असल्याचं पाहायला मिळतं आहे. रूग्णवाहिकेला रस्ता करून देण्यासाठीची त्या लोकांची तळमळ व्हिडीओत दिसून येत आहे. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी संपूर्ण रस्ता काही मिनिटातच मोकळ करून दिला.

ही घटना युनायटेड किंगडममधील असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्या लोकांना सलामी ठोकायची इच्छा होत आहे. तसेच ही व्हिडीओ पाहून त्या लोकांच्या माणूसकीला आणि त्यांनी केलेल्या कृत्याचं सर्वजण कौतुक करत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. नंतर तो nextdoor या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘British neighbors got out of their cars, clearing the road to make way for the ambulance tiktok via littleki_x’ असं कॅप्शनही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nextdoor (@nextdoor)

महत्वाच्या बातम्या-

मास्क नाही घातलं म्हणून पोलिसांनी जोडप्याला आडवलं तर बाई…

कौतुकास्पद! तहानलेल्या माकडाची अशापद्धतीने तहान भागवली, पाहा…

IPL 2021: दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनं दमदार विजय, पाॅईंट…

IPL 2021: यंदाची आयपीएल विराट जिंकणार??? आरसीबीच्या विजयाची…

‘मीदेखील खूप काही बोलू शकतो पण…..’ अनुषा…