“काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही”

मुंबई | आज राज्यभर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविषयीच चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

आज सकाळपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुंबई दौऱ्यानं तर राज्यातील राजकीय वातावरणच बदलून टाकल्याचं दिस आहे.

केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास दीड त्यांची बैठक सुरु होती.

बैठकीत देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी सांगितलं.

केसीआर यांनी आज उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली. मात्र काॅंग्रेसमधील कोणाचीही भेट घेतली नाही. त्यामुळे सध्या तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली आहे.

भाजपविरोधी सुरु असलेल्या तिसऱ्या आघाडीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे ‘संघी’ अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे, असं ट्विट यशोमती ठाकून यांनी केलं आहे.

दरम्यान, देशाच्या परिवर्तनाचा विचार करण्याची गरज आहे. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. देशातील समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असून देशाच्या परिवर्तनात लक्ष घालण्याचं महत्त्वाचं असल्याचंही केसीआर यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या संख्येत ‘इतक्या’ पटीनं घट, वाचा आजची आकडेवारी

  “तिसऱ्या आघाडीनं काहीही फरक पडत नाही, येणार तर मोदीच”

  “देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा”

  Uddhav Thackeray: “सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही”

  “उद्धव साहेब, सनम हम तो डूबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”