अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

नवी दिल्ली | माजी गृहमत्री अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वेच्च न्यायालयाने ‘ईडी’ला फटकारत देशमुख कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

योगेश देशमुख आणि शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केल्या होत्या. त्याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयाने ईडीला फटकारत मालमत्ता मुक्त करण्यास सांगितलं असल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपावरून ‘ईडी’ने देशमुख कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता ही 180 दिवसानंतरची कारवाई आहे. कायद्यानुसार अशा प्रकारे 180 दिवसांच्या नंतर मालमत्ता जप्त करता येत नाही.

सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनिल देशमुख यांचा मुलगा योगेश आणि सून शीतल यांच्या नावे असणाऱ्या जप्त केलेल्या मालमत्ता ‘ईडी’ला परत कराव्या लागणार आहेत.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

‘ग्रुप SEX करण्यास नकार दिल्याने…’; 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार 

“हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग…” 

“आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही” 

अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी!

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई