मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तरसभेत मनसैनिकांना संबोधित केलं होतं.
या भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तलवार भेट देण्यात आली होती.
राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
‘काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे’; पंकजा मुंडेंचा भावाला प्रेमाचा सल्ला
राज्यातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
…अन् मॅच सुरू असताना टॉपलेस होऊन मैदानात घुसली महिला, पाहा व्हिडीओ