मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादात कंगणाची उडी, म्हणाली…

नवी दिल्ली | भाजपने अखेर प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित (Nupur Sharma Suspended) केलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी नुपूरला पक्षाने निलंबित केलं आहे.

भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने नुपूर शर्मा यांच्या निलंबनाचे पत्रही जारी केलं आहे. यासोबतच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनीही पक्ष सर्व धर्मांचा आदर करत असल्याचे पत्र जारी केलं आहे.

27 मे रोजी ज्ञानवापी विषयावरील एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात काही अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी आरोप केला की, काही लोक हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. यानंतर नुपूर शर्मा यांनी इस्लामिक श्रद्धांचा उल्लेख केला.

मोहम्मद जुबेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नुपूरची व्हिडीओ क्लिप शेअर करून पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यानंतर नुपूर यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. आता या प्रकरणावर अभिनेत्री कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे.

नूपुरला तिचं म्हणणं मांडण्याचं स्वतंत्र्य आहे. तिला ज्या प्रकरे धमक्या दिल्या जात आहे ते मी पाहिलं आहे. जेव्हा प्रत्येक दिवशी हिंदू देवतांना अपमानित केलं जातं तेव्हा आपण न्यायालयात न्याय मागतो. किमान आता तरी असं करू नका, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

महिन्याला 1000 रूपयांची गुंतवणूक करून 2 कोटी जमवा, जाणून घ्या भन्नाट योजना 

“बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

राज्यातील आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेल्सचा एका माणसाचा दिवसाचा खर्च आहे ‘इतका’

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!