लग्न झाल्याच्या खुशीत नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमानं घातलं आहे. आताकुठं कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात लावलेले निर्बंध कमी करण्यात आले आहेत.

तसेच कोरोना काळामध्ये अनेक मुला-मुलींच्या लग्नाचे बार उडाले आहेत. आजकाल तर लग्न हा एक ट्रेंडच झाला असल्यासारखं वाटत आहे. आधी काही ठराविक महिन्यांमध्येच लग्न पार पडायची. परंतू आता कोणत्याही दिवशी लग्न होताना दिसत आहेत. काही लोकं तर शुभ मुहूर्त न बघताही लग्न करतात.

लग्नातील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. सध्या याच विषयाशी निगडीत असलेला एख व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये दोघं नवरा-नवरी आपल्याच लग्नात सर्व वऱ्हाडी मंडळींसमोर नाचत आहेत. लग्न हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असतो. लग्न व्हाव ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि पूर्ण झाल्यावर काय आनंद होतो , ते आपण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील नवरा-नवरीच्या तोंडावरून याचा अंदाज लावू शकतो.

लग्न झाल्यानंतर चक्क नवरा-नवरी वाजंतत्रीच्यासमोर जातात आणि त्यांना एक गाण वाजवायला सांगतलाल. त्यावर ते दोघेही चांगलेच थिरकत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

त्या दोघांना नाचताना पाहून मंडपातील वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्काच बसला असल्याचं दिसून येतं आहे. ते ज्या पद्धतीने नाचत आहे. ते बघितल्यावर असं वाटत आहे की, त्यांना त्यांच लग्न झालं असल्याचा आनंद त्यांच्या गगनात मावत नाहीय.

नवरा-नवरी नाचतानाचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलं असून, त्याला अनेकांनी लाईक देखील केलं आहे.

https://www.instagram.com/p/CT2D6K2lLDt/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

आपल्या मृत मुलाला सोंडेत घेऊन जातानाचा हत्तीणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण

मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ