Top news क्राईम

…म्हणून सख्या भावानेच भावाला जाळलं; बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

बारामती | बहुतेकवेळा घरात भावा भावांमध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्याच असतील. मात्र, बारामतीमधील एका गावात भावनेच भावाला पेटवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे.

बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी अंतर्गत असणाऱ्या राजबाग येथे मारुती भोंडवे आणि अनिल भोंडवे हे दोन भाऊ राहत होते. बुधवारी लहान भाऊ अनिल याचा आपल्या मोठ्या भावाशी वेगळं राहण्यावरून वाद झाला होता. बुधवारी रात्री मारुती भोंडवे त्यांची पत्नी सविता भोंडवे आणि दोन मुलं हे सर्वजण आपल्या राहत्याघरी झोपले होते.

यावेळी लहान भाऊ अनिल याने घराची बाहेरून कडी लावून घेतली. त्यांनतर घराच्या काचा फोडून मोठ्या भावावर पेट्रोल ओतत त्याला पेटवून दिलं. मारूती यांना लागलेली आग विझवण्यासाठी त्यांची पत्नी सविता प्रयत्न करू लागल्या मात्र त्यांनाही भाजलं. त्यानंतर सविता व त्यांच्या मुलांनी आरडाओरडा केल्यानं शेजारील लोक गोळा झाले.

दरम्यान,  मारुती भोंडवे यांना तात्काळ ससून रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी पोलिसांनी मारुती यांचा जबाब नोंदविला. मात्र, मारुती यांना 70 टक्के भाजल्यानं त्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला आहे. सध्या आरोपी अनिल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आजोबा आणि नातवाच्या वादावर रोहित पवार म्हणाले…

धक्कादायक! माहेरी रहात असलेल्या विवाहित भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार अन् मग…

ऐकावं ते नवलच! मौसम देवी या महिलेनं दिला चार बाळांना जन्म

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं लवकरच शुभमंगल सावधान; ‘या’ व्यक्तिसोबत अडकणार विवाह बंधनात!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात, ट्विट करत दिली माहिती