चवताळेली मगर आली तरूणावर धावून अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि अंगावर काटा येईल असे असतात.

आपण याआधी कुत्र्याला माणसांच्या अंगावर धावताना पाहिलं असेल. एवढंच नाहीतर तुम्ही एखाद्या वाघालाही माणसांवर झडप घालताना पाहिलं असेल.

परंतू तुम्ही कधी एखाद्या मगरीला चावताळलेलं पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर सध्या याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक मगर प्रमाणाबाहेर चवताळलेली असल्याचं दिसून येतं आहे. एका ठिकाणी काही घरांबाहेर खूपच पाणी साठलेलं असून, त्यामध्ये एक मगर इकडून-तिकडं फिरत आहे. त्या मगरीला पकडण्यासाठी दोन तरूण तिची दिशाभूल करून तिला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मगर खूपच चलाक असल्यामुळे ती त्यांचा तावडीत सापडत नसल्याचं पाहायला मिळतं आहे.

काही वेळ असाच प्रयत्न करून एक वेळ अशी आली की, ती मगर खूपच वैतागली आणि त्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या अंगावर धावून झायला लागली. मगरीचं हे विचित्र आणि भितीदायक रूप पाहून तिला पकडायला पाण्यात उतलेल्या तरूणांचीही पळता भूई झाली आणि त्यानंतर ते पाण्याच्या बाहेर आले.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचप्रमाणे मगरीचा हा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी पाहिला आहे.

https://www.instagram.com/p/CUGObQbFvL3/?utm_source=ig_embed&ig_rid=276d7a17-809b-4cc4-8bfc-b3d9a0bc96ba

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चक्क भर मंडपातच नवरीला पाहून नवरदेव लागला ढसाढसा रडायला, पाहा व्हिडीओ

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ आईने पोटच्या मुलाला मरणाच्या दारातून वाचवलं, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चालाकी करत भर लग्नात मेहुणीनेच मारला चान्स, पाहा व्हिडीओ

बड्डेची कॅन्डल विझवताना ‘या’ अभिनेत्रीच्या केसांना लागली आग अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता म्हैशीही करू लागल्यात स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ