जगन्नाथाच्या ‘या’ मंदिराचं कोडं आजवर वैज्ञानिकांना देखील उलगडलं नाही; वाचा सविस्तर

कानपूर | भारत देशात शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. या पुरातन मंदिरांची आपली एक वेगळी कहाणी आहे, वेगळा इतिहास आहे. तसेच भारतात अद्याप देखील अशी काही मंदिरे आहेत, ज्यांच्यापुढे वैज्ञानिकांचा अभ्यास देखील फेल ठरतो. भारतातील काही पुरातन मंदिरांमध्ये घडणाऱ्या अद्भुत घटनांविषयी निकष काढणं वैज्ञानिकांना देखील अवघड गेलं आहे.

असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. असं म्हटलं जातं की, हे मंदिर पावसाचा अचूक अंदाज वर्तवतं. म्हणजे एकवेळ हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज चुकेल. पण या मंदिराचा पावसाविषयीचा अंदाज केव्हाच चुकणार नाही

कानपूर जवळ असणाऱ्या बेहटा या गावामध्ये हे मंदिर आहे. येत्या काही दिवसांमध्ये जर त्या परिसरात पाऊस येणार असेल तर कडक उन्हातही या पावसाच्या छतांमधून पाणी गळतं. मात्र, त्या परिसरात पाऊस पडायला सुरुवात झाली की छतातून पाणी गळणं बंद होतं.

भगवान जगन्नाथाच्या प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. जगन्नाथाच्या मुख्य मंदिरात जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या शेकडो वर्षे जुन्या काळ्या पाषाणाच्या मुर्त्या आहेत. तसेच भगवान जगन्नाथाच्या या मंदिराच्या समोरच्या बाजूला सूर्यदेव आणि पद्मनाभ यांची देखील मंदीरं आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळा सुरू होण्याअगोदर सहा ते सात दिवस या मंदिराच्या छतातून पाणी ठिपकू लागतं. या छतातून किती प्रमाणात पाणी ठिपकतंय त्या प्रमाणात त्या वर्षीच्या पावसाचा अंदाज लावला जातो. मात्र, एकदा पावसाला सुरुवात झाल्यास हे छत पूर्णपणे कोरडे होऊन जाते.

अनेक अभ्यासकांनी आणि वैज्ञानिकांनी या ठिकाणी येऊन मंदिराचा अभ्यास केला आहे. मात्र, आजतागायत कोणालाच या मंदिराच्या रहस्याचा उलगडा होऊ शकला नाही. पाऊस येण्यापूर्वी या मंदिराच्या छतांमधून पाणी कसे ठिपकतं, ही गोष्ट आजवर कोड्यातंच राहिली आहे.

तसेच या जगन्नाथ मंदिराची नेमकी निर्मिती केव्हा झाली? याची देखील माहिती उपलब्ध नाही. काही पुरातत्ववेत्त्यांच्या अभ्यासानुसार दहाव्या शतकाच्या पूर्वी या मंदिराची निर्मिती झाली आहे. तर अकराव्या शतकात या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे.

काही अभ्यासक हे मंदिर सम्राट अशोकाच्या कालखंडात बनवण्यात आल्याचं देखील सांगतात. या मंदिराची रचना एखाद्या बौद्ध विहाराप्रमाणे करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या समोर खूप मोठं प्रांगण आहे.

महत्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! दिल्लीत भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं; व्हिडीओ व्हायरल

‘हे काय वागणं आहे सिद्धार्थ?’ लग्नाच्या दोन महिन्यात मिताली-सिद्धार्थचं झालं भांडण?, वाचा नेमकं काय झालं

फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का?; आज करतेय…

कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! इयत्ता चौथीच्या…

‘या’ अभिनेत्रीच्या चित्रपटातून इरफान खानचा मुलगा…