खुशखबर! तरुणाईची लाडकी ‘पब्जी’ आता भारतात पुन्हा येणार?

मुंबई| कोट्यावधी चाहते असणारी पब्जी लवकरच भारतात परत येणार आहे. यापूर्वी पब्जी भारतात परत येणार, असं फक्त बोललं जात होतं. मात्र, आता कंपनीने याबद्दल एक टीझर व्हिडिओही शेअर केला आहे.

न्यू पब्जी मोबाइल भारतात येत आहे. या गेमला आपल्या सर्व मित्रांसह शेअर करा, असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच एका अहवालानुसार नवीन पब्जी मोबाइल गेमसाठी पूर्व-नोंदणी टॅपटॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

तसेच पब्जी गेमच्या निर्मात्यांनीही सांगितले आहे की, पब्जी मोबाइल इंडिया नावाच्या गेमच्या नव्या आवृत्तीवर काम सुरू आहे. पब्जी मोबाईल इंडिया खास भारतीय वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आली आहे.

यामध्ये डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे. व्हिडीओ गेम, एस्कॉर्ट्स तसेच करमणूक व आयटी उद्योगांना पुढे नेण्यासाठी पब्जी कॉर्पोरेशनची मूळ कंपनी क्राफ्टॉनदेखील भारतात 100 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

तसेच पब्जीची मालकी असणारी दक्षिण कोरियाच्या क्राफ्टन इंकने अलीकडेच जाहीर केले आहे की, सुरक्षा आणि गोपनीयतेची चिंता कमी करण्यासाठी नवीन गेम पब्जी मोबाइल इंडिया तयार करण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात क्राफ्टनने गेम होस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट बरोबर जागतिक करारावर स्वाक्षरी केली होती. यावेळी कंपनीने म्हटले होते की, भारतीय वापरकर्त्याचा डेटा गोपनीयता आणि सुरक्षा ही पब्जी कॉर्पोरेशनची प्राथमिकता आहे. ही गेम लवकरंच भारतात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.

दरम्यान, पब्जी कंपनी आता सुरक्षा आणि बळकटीकरणासाठी भारतीय वापरकर्त्यांची वैयक्तिक ओळख असलेल्या स्टोरेज सिस्टमवर नियमितपणे ऑडिट आणि पडताळणी करेल. त्यांचा डेटा सुरक्षित राहील याची खात्री करेल.

टेन्सेन्टच्या चायनीज मार्गामुळे आणि दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे सुरुवातीला या गेमवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ही गेम भारतियांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार? बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या…

भाजपला मोठा धक्का! भाजपला मी धडा शिकवणार म्हणत ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

मोठी बातमी! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरचा पवारांचा पहिलाच खानदेश दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

‘…म्हणून राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतलं आहे’; प्रसाद लाड यांचा मोठा गौप्यस्फोट!

टायगर श्रॉफच्या बहिणीचा ‘त्या’ घटनेबद्दल मोठा खुलासा! स्वतः सोशल मीडियावर म्हणाली…