मोठी बातमी! Omicron चा धसका; ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

अकोला | कोरोना व्हायरसचा (Corona virus) नवीन व्हेरिएंट (Omicron ) ओमिक्रॉन जगभरात वेगानं पसरत आहे. हा व्हेरिएंट एका आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेतून (Omicron Cases in South Africa) 25 देशांमध्ये पोहोचला आहे. Omicron नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू केलेत. ओमिक्रॉन (Omicron )व्हेरिएंटचा प्रसार टाळण्यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

अकोला पहिलाच जिल्हा जिथे जमावबंदी झाली लागू ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा धोका वाढू नये म्हणून अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आलेत. कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून पासून शहरी व ग्रामिण भागात जमावबंदीचा आदेश लागू असेल. या काळात कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असेल.

दरम्यान, कर्नाटकात ओमिक्रॉन  विषाणूने बाधित असलेल्या दोन व्यक्ती सापडल्यानंतर राज्यात खबरदारी घेतली जात होती. त्यातही डोंबिवलीत ओमिक्रॉन विषाणूने बाधित एक रुग्ण आढळला आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.

सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron ) शिरकाव झाल्यामुळे आता जिल्हा पातळीवरील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याची प्रचिती अकोला जुल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशातून आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

सावधान! ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका

“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल” 

‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख 

“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”